भटक्या कुत्र्यांचं मांस विकणारी टोळी गजाआड; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

त्रिपुरा : अनेकदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमुक एखाद्या हॉटेलमध्ये कुत्र्याचं मांस विकलं जात असल्याचा अफवा वाचत असतो मात्र आज त्रिपुरा येथील स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये खरोखरच अशी कृत्य करणाऱ्या एका टोळीला रंगेहात जेरबंद केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, त्रिपुरा-मिझोराम सीमेवर आज त्रिपुरा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये कुत्र्यांच्या मांसाचा व्यापार करणाऱ्या दोघांना १२ जिवंत कुत्र्यांसोबत ताब्यात घेतलं आहे.

याबाबत माहिती देताना त्रिपुरा पोलिसांनी सांगितलं की, ‘सदर इसम परिसरातील १२ भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची विक्री करण्यासाठी मिझोराम येथे निघाले होते मात्र रस्त्यात आरोपींचे वाहन तपासणीसाठी थांबविले असता सदर प्रकार समोर आला.’

दरम्यान, पोलिसांनी वाहनातील दोन्ही इसमांची कसून केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा काबुल केला असून मिझोराम येथे कुत्र्याच्या मांसास चांगली मागणी असल्याने एका कुत्र्याचे २००० ते २५०० मिळतात अशी माहिती दिली. सदर प्रकरणाबाबत चौकशी सुरु असून या प्रकरणी आणखीनही काही लोकांची नावं उघड होण्याची शक्यता पोलिसांनी दर्शवली आहे.

Tripura: Police arrested two persons from Tripura-Mizoram border with 12 stray dogs. Police say,”they were trafficking these dogs to Mizoram. During interrogation they revealed that in Mizoram each dog fetches between Rs 2000-2500 as dog meat has good demand.” pic.twitter.com/YCKqoIV9Q1

— ANI (@ANI) December 29, 2019

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.