आणखी वाढणार पेट्रोलचे दर; ‘हे’ आहे कारण

तेल उत्पादक देशांचा उत्पादन वाढविण्यास साफ नकार

नवी दिल्ली – सध्या क्रुडचे दर प्रमाणाबाहेर वाढले आहेत. जग करोनातून बाहेर पडत असताना क्रुडचे दर आणखी वाढू नये, याकरिता क्रुड उत्पादक देशांनी उत्पादन वाढवावे असा आग्रह भारताने केला होता. मात्र क्रुड उत्पादक देशाच्या संघटनेने भारताचा आग्रह अमान्य केला आहे. त्यामुळे आगामी काळात क्रूडचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर भारतातील पेट्रोल व डिझेल आणि गॅसचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भारताने क्रुड उत्पादन वाढविण्याची मागणी करूनही तेल उत्पादकांची संघटना असलेल्या ओपीईसीच्या बैठकीत एप्रिल महिन्यात तेलाचे उत्पादन न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताकडे स्वस्त तेलाचा साठा
भारताच्या उत्पादन वाढविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना सौदी अरेबियाने म्हटले आहे की, क्रुडचे दर 19 डॉलर असताना भारताने एप्रिल महिन्यात 16.71 दशलक्ष पिंप क्रुडची खरेदी करून त्याचा साठा केला आहे. अडचण असेल तर भारताने या साठ्यातून क्रुडचा उपयोग करावा. मात्र आम्ही क्रुडचे उत्पादन वाढविणार नाही. दरम्यान जागतिक क्रुड बाजारात आज क्रुडचे दर सव्वा टक्‍क्‍यांनी वाढून 68.11 डॉलर प्रति पिंपावर गेल.

केंद्र कर कपात करणार नाही
दरम्यान या विषयावर पत्रकारांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारले असता त्या म्हणाल्या की पेट्रोलवर केंद्र आणि राज्यांचे कर आहेत. केंद्र सरकार आपण होऊन एकतर्फी कर कपात करणार नाही. केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. मात्र राज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात करांमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे केंद्राने कर कपात करावी असे राज्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.