नवी दिल्ली – आपल्या कर्मचाऱ्यांच्या करोनावरील लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी अनेक कंपन्यांनी दर्शविली आहे. ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ऍक्सेंचर, इन्फोसिस, स्टेट बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज चा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा करोनावरील लसीचा खर्च करण्यास तयार आहोत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या अगोदरच उद्योजकांच्या संघटनांनी केले आहे.