Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा | डीझेल दरवाढीमुळे शेतीमशागत महागली

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2024 | 3:19 am
पुणे जिल्हा | डीझेल दरवाढीमुळे शेतीमशागत महागली

लोणी काळभोर, (वार्ताहर)- डीझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसायही यातून सुटला नाही. डीझेलचे दर वाढले आणि शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढल्याने पिकांसाठी होणारा खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.

शेती मशागतीसाठी बैलजोडी मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना ट्रॅक्टरद्वारे शेतीकामे करून घ्यावी लागत आहेत. अशातच इंधनाचे दर वाढल्यामुळे नांगरणीचेही दर वाढले आहेत. तालुक्यात बैलाची संख्या घटल्याने शेतीकामे ही मशीनच्या साहाय्याने करावी लागत आहेत. त्यातच इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, ट्रॅक्टरने शेती करावी लागत आहे.

आता पिकांची काढणी झाली असून, शेतकरी नांगरणी करण्यासाठी धावपळ करत आहेत. अल्पभूधारक व गरीब शेतकर्‍यांना दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत आहे. उत्पन्नाऐवजी मशागत, पिकांचा खर्च पाहता तोटा सहन करावा लागत आहे. डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन भाववाढ पाहता नांगरणीचेदेखील भाव वाढले आहेत. शेती मशागतीचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, शेती करणे कठीण होत आहे. शेती विकून दुसरा कामधंदा करावा अशी मनस्थिती शेतक-यांची झाली आहे.

पूर्वी बैलांच्या मदतीने शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये बैलांना खाण्यासाठी लागणारा चारा वगळता कोणताही खर्च शेतकर्‍यांना येत नव्हता. हा चारा शेतक-याच्या शेतात उपलब्ध होत असे. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी शेतातील कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवत असे. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही, असे समीकरण तयार झाले होते.

बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले अन् शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दहा वीस वर्षांत शेतीत आमूलाग्र बदल झाला. चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटाव्हेटर फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. त्यामुळे शेतकर्‍यांचा वेळ वाचला, अंग मेहनत वाचली मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला.

सद्य:स्थितीतील शेती मशागतीचे दर (प्रती एकर) –
नांगरणी – 4000 रुपये
रोटाव्हेटर मारणे – 3500 रुपये
एकेरी फणणी – 1250 रुपये
दुहेरी फणणे – 2500 रुपये
वाफे तयार करणे – 1200 रुपये
सरी पाडणे – 2500 रुपये
पेरणी – 2400 रुपये

दिवसा नांगरणी करा
सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत. पूर्वी दिवसा बैलजोडीने नांगरणी होत असे. त्यावेळी पक्षी शेतातील कीड खाऊन नियंत्रणात आणायचे. आता रात्री-अपरात्री ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी केल्यामुळे कीड नियंत्रणात येत नाही. कीड नियंत्रणासाठी शेतकर्‍यांनी दिवसा नांगरणी करणे गरजेचे आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Agricultural businessagriculture became more expensivediesel pricediesel pricesDiesel prices increaseddue to increaseFarming by tractorloni kalbhor newspair of oxen
SendShareTweetShare

Related Posts

वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत
Top News

वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

May 25, 2025 | 10:24 am
शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
Top News

शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

May 25, 2025 | 10:13 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am
Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
Top News

Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

May 25, 2025 | 9:31 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!