नवी दिल्ली – आपल्याकडे अशी म्हण आहे की, ‘घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून’! खरंच लग्न करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. लग्न सोहळ्यातून केवळ मुलगा आणि मुलगी विवाहबंधनात अडकतात असं नाही तर त्यांच्यासोबत दोन कुटुंब एकमेकांसोबत नातं जोडत असतात. लग्न हा संपूर्ण कुटुंबासाठीच भावनिक विषय असल्याने अनेकदा रुसव्या फुगव्यांचे प्रसंग आल्याचेही आपण पाहतो. याबाबतचे अनेक मजेदार व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लग्न सोहळ्यातील असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमका काय आहे व्हिडीओ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू तिच्या आईसोबत बसली आहे आणि तिच्या मागे अनेक महिला उभ्या आहेत. मागे उभ्या असलेल्या महिला आपापसात काही तरी प्लॅन करत असल्याचं दिसतंय. तर सूटा-बूटामध्ये नवरदेव त्यांच्या पुढे उभा राहून काही विधी करत आहे. विधी सुरु असताना उभा असलेला नवरदेव खाली वाकतो. नवरदेव खाली विकल्याचे पाहताच मागे उभ्या असलेल्या महिलांमधून अचानक हातात हार असलेली एक महिला नवरदेवाच्या गळ्यात हार टाकण्यासाठी त्याच्या दिशेने उडी मारते. मात्र त्या महिलेला नवरदेवाच्या गळ्यात हार घालता येत नाही. ती महिला हातातील हारासह नवरी आणि व तिच्या आईच्या अंगावर पडते. उडी मारूनही हार घालता न आल्याने ती उठून परत जाते. हा व्हिडिओ haqsevella नावाच्या इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
सोशलवर कमेंट्सचा पाऊस
सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एक यूजर विचारतो की, “तिने अशी उडी का मारली?”. तर दुसर्या यूजरने लिहिले की, “मिशन वाईटरित्या अयशस्वी झाले”. अन्य एक युजर लिहितो, “आता फक्त हेच बघायचे बाकी होते”. एका युजरने या व्हिडिओची मजा घेताना, ‘बहुतेक त्या स्त्रीला नवरदेवाकडे ५ एकर लिंबाची शेती असल्याचं कळलं असावं.’ अशी कमेंट केली आहे.
पहा व्हिडीओ :
View this post on Instagram