ऐतिहासिक होळकर वाड्यासाठी निधी मिळवून देणार

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ः जेजुरीत धनगर समाजाचा अठरावा वधुवर मेळावा संपन्न

जेजुरी- महाराष्ट्राचे कुलदैवत व होळकर घराण्याचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाच्या श्रीक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये ऐतिहासिक होळकर वाडा डागडुजी व सुधारणा करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मिळवून देणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जेजुरी येथे आयोजित सर्व जातीय, सर्व प्रांतीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये सांगितले.

अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था पुणे यांच्यावतीने अठरावा आंतरराज्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर परिसरामध्ये करण्यात आले होते. त्याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी तळोदे संस्थानचे जहागीरदार अमरजीतराजे बारगळ, माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, जेजुरीच्या नगराध्यक्षा विणा सोनवणे, मुकुंद कुचेकर, उद्योजक तुकाराम काळे, फलटणचे माजी सभापती शंकरराव मारकड, जयवंतराव कवितके, बाळकृष्ण गवते, सूर्यकांत गोफणे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भरणे यांनी वैयक्तिक दोन लाख 22 हजार 222 रुपये ऐतिहासिक होळकर वाड्याच्या बांधकामासाठी देऊ केले. या मेळाव्याप्रसंगी माजी आमदार प्रकाश शेंडगे, अमरजीतराजे बारगळ, विणा सोनवणे आदिंनी मनोगत व्यक्त केले. या वधु-वर परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी धनगर समाजातील अनेक वधू-वर यांनी आपली नावे नोंदवून परीचय दिला. हा मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मधुकर लंभाते, रमेश नाचन, विजय भोजणे, अनिल भांड, राहुल लंभाते, सुरेश भांड, सुनिल शेंडगे, सोमनाथ नजन, रमेश लेंडे, शंकर रुपनवर, नागेश तितर, गोविंदराव कवितके, अभिजित कवितके आदिंनी अथक प्रयत्न केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश भांड यांनी केले तर स्वागत रमेश लेंडे यांनी व किसनराव पोटे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.