भुलेश्वर – पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील परसबाग उपक्रम घेतला आहे. उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदले आहेत.
उपक्रमशील मुख्याध्यापक सुधीर मेमाणे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक व विद्यार्थ्यानी एकत्र येऊन शाळेच्या आवारातच परसबाग फुलवली आहे. त्यामुळे शाळेचा परिसर हिरवाईने नटणार आहे.
पाण्याचा कमीत कमी वापर या परसबागेत केला जातो. जेवणापूर्वी मुले हात धुण्यासाठी परसबागेत जातात. पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग हा ग्रामीण भाग आहे. या भागात लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
वाढत्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण झटपट पैसा कमविण्याच्या नादात शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. परसबागेच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शेतीची सुध्दा गोडी लागावी, असा परसबागेचा उद्देश असल्याचे सहशिक्षक भाऊसाहेब जगताप यांनी सांगितले.