रोम – इटलीतील पहिल्या क्रमांकाचा फरार माफिया बॉस मॅटेओ मेसिना देनारो याला आज अटक करण्यात आली. सिसिली येथील पोलमेरोमधील एका खासगी क्लिनिकमध्ये त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. मेसिना देनारो हा काही वैद्यकीय उपचारांसाठी या क्लिनिकमध्ये दाखल झाला होता, असे विशेष मोहिमेच्या प्रमुखांनी सांगितले.
मेसिना देनारो याला अटक केल्यानंतर लगेचच अज्ञात ठिकाणी नेण्यात आले, असे इटलीच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. देनारो सुमारे 30 वर्षांपूर्वी फरार झाला होता. आता तो 60 वर्षांचा आहे. मेसिना देनारो हा सिसिलीच्या पश्चिमेकडील त्रपानी या बंदराच्या शहरातील ताकदवान माफिया आहे. तो फरार असतानाही त्याची दहशत कायम असायची. त्याला सिसिलीतील कोसा मोस्ट्र म्हणूनच ओळखले जायचे. देनारो याच्यावर हत्याचे अनेक खटले त्याच्या अनुपस्थितीतच चालवण्यात आले आहेत आणि त्याला जन्मठेपेच्या अनेक शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.
याशिवाय 1992 मध्ये सिसिली येथील दोन बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातही त्याला शिक्षा होणार आहे. या बॉम्बस्फोटामध्ये माफियाविरोधी सरकारी वकिलाची हत्या करण्यात आली होती. याशिवाय पूर्वाश्रमीच्या माफियाच्या मुलाची हत्या करण्याच्या आरोपातही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह अॅसिडमध्ये विरघवळण्यात आला होता.
Optical Illusion : फक्त 3 टक्के लोकांनी शोधला ‘या’ फोटोत लपलेला बेडूक, पाहा तुम्हाला दिसतोय का?
माफिया बॉसचा बॉस समजला जाणारा आणि 23 वर्षांपासून फरार असलेला सल्वाडोर टोटो रीना याला पालेमो अपार्टमेंटमधून अटक करण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी देनारो याला देखील अटक करण्यात आली आहे.