मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात तांडव केला आहे. त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरले आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे देशातील करोनाचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देश लॉकडाउन मध्ये आहे. सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत.
लॉकडाउन काळात अनेकांना घरात बसून काय करावे असा प्रश्न पडला होता.अशातच केंद्र सरकारने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ अशा लोकप्रिय मालिकांचे पुनः प्रक्षेपण केले. दरम्यान, यामध्ये रामायण चे पुनः प्रक्षेपण अतिशय यशस्वी ठरले आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आता रामायण ने नवीन पराक्रम केला आहे. जगभरातील सर्वात जास्त पाहिले जाणारे कार्यक्रम म्हणजेच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘बिग बँग थेरी’ यांच्यावर मात करत रामायण जगभरात सर्वात जास्त पाहिला गेलेला कार्यक्रम बनला आहे. 16 एप्रिल रोजी रामायण ने 77 मिलियन लोकांनी पहिले आणि नवीन रेकॉर्ड स्थापित झाले. त्यामुळे पुन्हा एकदा जुनं ते सोनं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.