नवी दिल्ली – देशभरात करोनाचा धोका असला तरीही काही महाभाग अजूनही घराबाहेर विनाकारण फिरताना दिसतात अशा लोकांची जनजागृती करण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने आयपीएलमधील एक फोटो व व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला प्रचंड लाइक मिळत आहेत.
देशात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक कामांसाठीच नागरिकांनी घराबाहेर पडावे अशा सूचना असतानाही अनेक जण विनाकारण फिरताना दिसतात. जडेजाने आयपीएलमधील एका सामन्यात धाव पूर्ण करताना रमतगमत चालत असलेल्या जसप्रीत बुमराहला थेट चेंडूफेकीवर धावबाद केले होते. त्या क्षणाचा फोटो जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट केला व टाइमपास करत आहात, तर असेच होणार अशी अफलातून कॅप्शनही दिली आहे.
Bahar bindaas gumthe ho. Mast meh timepass karthe ho, jab aapko ghar pe rahena chahiye. Phir yeh toh hona he tha 😉 #Staystaysafe #runoutmathona pic.twitter.com/UfggndGMkG
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 28, 2020
करोनाचा धोका असल्याने देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा आहे. तरी देखील अनेक शहरातील नागरिक याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवत नसून विनाकारण फिरताना दिसतात. त्यांना बाबांनो घरातच थांबा अशी विनंती जडेजाने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, त्यात काहीही सुधारणा झाली नसल्याचे समोर आल्याने जडेजाने हा फोटो पोस्ट करत जनजागृती करण्याची अजब संकल्पना राबविली.