सिडनी – भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने पदार्पणणातच जसप्रीत बुमराह व लसित मलिंगा यांच्या कामगिरीची बरोबरी केली. संघात मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. त्याने टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात सहा बळी घेत या दोन्ही गगोलंदाजांच्या कामगिरीची बरोबरी केली.
बुमराहने 2016 साली ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरुद्ध टी-20 मालिकेत सहा बळी घेतले होते. तर मलिंगाने 2017 साली अशी कामगिरी केली. नटराजन व बुमराह यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एकाच पद्धतीने सुरू झाली.
बुमराहला एका खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे पदार्पणाची संधी मिळाली होती. नटराजनलाही त्याच धर्तीवर संधी मिळाली. या दोघांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले. दुसऱ्या टी-20 सामन्यात 3 तर, तिसऱ्या टी-20 सामन्यात 1 बळी घेतला. बुमराहप्रमाणेच नटराजननेही पदार्पणाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
टी नटराजन- 6 बळी (2020)
लसित मलिंगा- 6 बळी (2017)
जसप्रीत बुमराह- 6 बळी (2016)
बुमराहशी नटराजनची बरोबरी
पहिला एकदिवसीय सामना – 2 बळी
पहिला टी-20 सामना – 3 बळी
दुसरा टी-20 सामना – 2 बळी
तिसरा टी-20 सामना – 1 बळी