पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 294 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नवीन 114 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93928 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 114 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिट्व्ह आला नाही. आज दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील चिंचवड येथील एक व शहराबाहेरील धनकवडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत 2401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1711 तर शहराबाहेरील 690 रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात 294 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 90473 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2719 संशयित रुग्णांना तपासणीला दाखल केले आहे.