पुणे, दि. 27 – भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी 2.67 टीएमसी पाणी आरक्षणास प्रस्तावास जलसंपदा विभागाने मुदतवाढ दिली आहे. 2019 मध्ये पुणे महानगरपालिकेस भामा आसखेड धरणातून बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावावरून भामा आसखेड प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी वापरापोटी भरावयाचा सिंचन पुर्नस्थापना खर्चाची रक्कम विहित मुदतीत न भरल्याने करारनामा करता आला नाही त्यामुळे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी पाण्याचे आरक्षण आपोआप रद्द झाल्याचे कळविले होते.
पूर्वीचे मंजूर आरक्षण हे त्यावेळी सक्षम प्राधिकरणाने प्रचलित नियमानुसार मंजूर आहे. पूर्वी मंजुर केलेली आरक्षणे अबाधित आहेत. त्यामुळे नवुआने पाणीवापर आरक्षण मंजुर करण्याची आवश्यकता नाही.
यापूर्वीच्या भामा आसखेड धरणातून मंजुर आरक्षणानुसार करारनामा करण्यासाठी मुदतवाढ देणे, पुर्नस्थापना खर्च भरण्याबाबतच्या कालावधीत सवलत व मंजुर आरक्षण पुढे चालु ठेवणे आदी बाबी शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने या पाणी आरक्षणास प्रस्तावास मुदतवाढ दिली आहे.