नाभिक समाजातील मान्यवराच्या हस्ते केले वितरण
पाथर्डी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नाभिक महामंडळ पाथर्डी, संत सेना महाराज सलून असोसिएशन व ज्ञान कृष्णा प्रतिष्ठान पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातील सलून व्यावसायिकांना करोनाच्या विरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. येथील संत सेना महाराज मंदिरात सोशल डिस्टंन्सिंग पाळून प्रमुख मान्यवरांचे हस्ते या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष विकास मदने, नगर जिल्हा सलून अध्यक्ष जनार्दन वाघ, जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी उपस्थित राहून सलून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.यानिमित्ताने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये शहराध्यक्षपदी गणेश राऊत, उपाध्यक्षपदी आजिनाथ जायभाय, युवा शहर अध्यक्षपदी आदित्य चातुर, तालुका युवा उपाध्यक्षपदी सागर शिंदे, शहर युवा उपाध्यक्षपदी सचिन पंडित, तालुका युवा संघटकपदी गणेश क्षीरसागर, शहर युवा सचिवपदी वैभव मर्दाने, खरवंडी विभाग प्रमुखपदी बाळासाहेब राऊत, खरवंडी सलुन अध्यक्षपदी कृष्णा गायके, विभागीय उपाध्यक्षपदी लक्ष्मण गायके, युवा विभागपदी राहुल राऊत, कोरडगाव विभाग प्रमुखपदी अशोक रावतळे, युवा विभाग प्रमुखपदी विकास रावतळे, माणिकदौंडी विभाग प्रमुखपदी गणेश काळे, युवा विभाग प्रमुखपदी दिनेश आगळे, तिसगाव विभाग प्रमुखपदी दत्तू पंडित, उपविभाग प्रमुखपदी रामेश्वर पवळे, मिरी विभाग प्रमुखपदी शंकर गायकवाड, करंजी विभाग प्रमुखपदी महेश औटी, पाडळी विभाग प्रमुखपदी राजेंद्र क्षिरसागर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर जनसेवा या राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी आत्माराम बिडवे, उपाध्यक्षपदी गणेश मर्दाने यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन सोनवणे, उपाध्यक्ष दीपक जगताप, तालुका सचिव महादेव गायके, तालुका संघटक बाबुराव वखरे, सलून असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शेळके, युवा अध्यक्ष भाऊसाहेब पंडित, जिल्हा युवा कार्याध्यक्ष सनी मर्दाने, ज्ञानेश्वर गायके, बाबासाहेब जायभाय, राजेंद्र राऊत, सुनील मर्दाने प्रदोष साळुंखे, बाबासाहेब चातुर, सुखदेव जायभाय, भाऊसाहेब जायभाय, देविदास मर्दाने, सोमनाथ राऊत, सुरज काशीद, महादेव तुकाराम गायके, सतीश बिडवे, छोटू शेळके, निवृत्ती पंडित, रघुनाथ पंडित, दीपक शेळके, अशोक पंडित, सचिन राऊत, रणजीत पंडित, ज्येष्ठ मार्गदर्शक दादा मर्दाने, नारायण मर्दाने, गोरक्ष राऊत यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. टप्प्या टप्प्याने सर्व समाजबांधवांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.