पिंपरी, दि. 30 – मोरवाडी पिंपरी येथील एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय व जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठान, पिंपरी यांच्या वतीने आणि प्रयाग संस्था यांच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील शिबिरात प्रयाग संस्थेमार्फत प्रशिक्षित वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली व महिलांना कॅन्सर बद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा शंभराहून अधिक महिलांनी लाभ घेतला. तपासणीदरम्यान महिलांना माहिती पुस्तिका व खबरदारीच्या उपाययोजना व आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सुभद्रा एज्युकेशन सोसायटीच्या संचालक ऍड. ऋतुजा भोसले आणि वायसीएम मेडिकल कॉलेजच्या डॉ. दीपाली गायकवाड, डॉ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लक्षवेधी स्पोर्टस फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता आल्हाट , राजमाता जिजाऊ वुमेन्स फेडरेशनच्या अध्यक्षा वैशाली गव्हाणे, माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच अश्विनी कांबळे, शीतल मासुळकर, उषा उभारे, रेणुका भोजने आदी उपस्थित होते. या शिबिरास जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठान पिंपरीच्या अध्यक्षा कविता खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरास एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांनी उपस्थितांना कॅन्सर जनजागृती व महिलांच्या कायदेविषयक अधिकारांबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिराचे समन्वय प्रा. उज्ज्वला भारती आणि प्रा. स्वप्नील जाधव तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थितत होते.