पिंपरी, (प्रतिनिधी) – स्टॉक मार्केटमधून 30 टक्के नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून एकाची 30 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 डिसेंबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हिंजवडी येथे घडली,
याप्रकऱणी 44 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून विविध व्हॉटसअप ग्रुप, टेलिग्राम खाते, बँक खाते धारक अशा, दहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फेसबुकवर स्टॉक मार्केटची लिंक आली.
त्यावर फिर्यादी यांनी क्िलक करताच त्यांना एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड कऱण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटमधून 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले. पुढे वेगवेगळ्या खात्यावर गुंतवणुकीसाठी म्हणून फिर्यादी यांच्याकडून पैसे घेण्यात आले.
मात्र फिर्यादी यांना त्यांची मूळ रक्कम व नफा न देता त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे काढायचे असतील तर 10 टक्के टॅक्स भरावा लागेल, असे सांगत एक खासगी क्रमाक दिला.