नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक समज आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा पुढाकार घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील नागरिकांदरम्यानच्या थेट संपर्कावर भर देण्याबाबत एकमत झाले होते, असे फ्रान्स दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतातील 30 हजार विद्यार्थ्यांना 2030 पर्यंत फ्रान्समध्ये प्रवेश देण्याचे उद्दिष्ट असल्याची घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शैक्षणिक यशाला प्रोत्साहन मिळेल, असे फ्रान्सचे मानणे आहे.
फ्रान्सने गेतलेल्या पुढाकारानुसार फ्रान्समधील शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच शिक्षण व्यवस्था अवगत करता येईल. हे विशेष कार्यक्रम फ्रेंच भाषा आणि इतर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कसून प्रशिक्षण देतील. जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारतीय माजी विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षांचा शेंजेन सर्कुलेशन व्हिसाचीही घोषणा करण्यात आली होती.
ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांनी फ्रान्समध्ये किमान एक सेमिस्टर अभ्यास केला आहे ते 5 वर्षांच्या शॉर्ट-स्टेशेन्जेन व्हिसासाठी पात्र आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.