शिरूर-शिरूर शहरात विविध चार भागांमध्ये चार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली.
शिरूरमध्ये काल एकच करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यामुळे शिरूर शहराला दिलासा मिळाला; परंतु आज चार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा शहराची धाकधूक वाढली आहे. शिरूर शहरातील भाजीबाजार येथील 33 वर्षे पुरुष, सिद्धार्थनगर येथील 25 वर्षीय महिला, यशवंत कॉलनी येथील 40 वर्षीय व्यापारी, सुभाष चौक येथील करून आबादी त्याच्या संपर्कात आलेल्या 21 वर्षीय तरुण असे एकूण शिरूर शहरात करोना पॉझिटिव्ह चार रुग्ण आढळले.
शिरूर शहरातील नागरिक, व्यापारी आपला व्यवसाय करताना मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये, साबणाने हात धुवावे, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.