सातारा – जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 133 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
चार बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 55 वर्षीय पुरुष (खुबी ता. कराड), 70 वर्षीय पुरुष (चिकलगुठन, जि. सांगली), 70 वर्षीय पुरुष (वाडी, ता. खटाव) व फलटण येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 386258
एकूण बाधित – 62439
घरी सोडण्यात आलेले – 58189
मृत्यू – 1887
उपचारार्थ रुग्ण – 2363