“जलयुक्‍त शहर’साठी चार समित्या

पुणे  – भूगर्भ पाणीपातळी वाढविणे, नैसर्गिक जलस्रोतांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या “जलयुक्‍त शहर’ अभियानाअंतर्गत चार समित्यांची स्थापना केली जाणार आहे. त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, मलनिःसारण, ग्राऊंड वॉटर रिचार्ज, तसेच प्लॅस्टिक निर्मूलनासाठी या समित्या काम करतील, अशी माहिती महापौर मुक्‍ता टिळक यांनी दिली.

यंदा अंदाजपत्रकात जलस्रोत पुनर्भरणासाठी अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत. हे अभियान चार टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. या समित्यांत महापालिका अधिकारी तसेच पर्यावरण आणि जलतज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या समितीची कार्यकक्षा आणि जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी महापौरांनी बैठक घेतली होती.

“जलशक्‍ती मिशन’मध्येही सहभाग
“जलयुक्‍त शहर’ अभियानाचा समावेश केंद्राच्या “जलशक्ती मिशन’मध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात हे मिशन प्रस्तावित असून त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे हे उपक्रम या मिशनशी जोडण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.