नगर – शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत असतानाही महापालिका प्रशासन सुस्त आहे. याचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने मुरुमाच्या गाड्या आणून दिल्ली गेट परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले आहेत.
शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण होत आहे. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नालेगाव गोगादेव मंदिरासमोरील रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
महापालिकेने खड्डे बुजविणारी कोणतीही उपाय योजना आतापर्यंत केलेली नाही.