सातारा (प्रतिनिधी)- माण तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या पत्नी कमल पोळ (वय 72, रा. मार्डी ता. माण) यांचे रविवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
कमल पोळ यांनी जिल्हा परिषद सदस्या म्हणूनही काम केले होते. पोळ तात्यांच्याबरोबर राजकारण, समाजकारणात त्या सक्रिय होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कमल पोळ यांचे निधन झाले.
त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. बाई म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ ही मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ व जिल्हा परिषद सदस्य डॉ. सौ. भारती पोळ यांच्या त्या सासूबाई होत.
दरम्यान, कमल पोळ त्यांच्यावर सोमवारी सकाळी 9 वाजता मार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.