लग्नाला जाताना गाडीचं टायर फुटलं; अपघातात आईसह एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पालघर – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईहुन गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या कारच्या मागील टायर फुटल्याने हा अपघात घडला.

नाझनीन शेख (46), मुझेन शेख (1) अशी मृतांची नावे आहेत. तर शाईन नाईक (46), आशिक अली (65), टूबा शेख(6), आतीफा शेख (9), जनाफ शेख (7), जोया शेख(6) आणि वाहन चालक अयान नाईक (29) अशी जखमींची नावे आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील माहिम परिसरात राहणारे शेख कुटुंब गुजरात वापी या ठिकाणी लग्नासाठी जात होते. त्यावेळी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरीजवळील सुसरी नदीच्या पुलावर कारचा टायर फुटला. यानंतर तोल गेल्याने वाहन पलटी झाली. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, यात वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात आईसह एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.