पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना अटक

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागा (नॅशनल अकाउंटेबिलीटी ब्युरो) ने लक्षावधी रुपयांच्या द्रवरुप नैसर्गिक गॅसच्या आयात करारासंदर्भात अटक केली. लाहोरमध्ये “एनएबी’ने लहोरमधीओल थोकर नियझ बेग भागात अब्बासी यांची कार अडवली आणि त्यांना अटक केली. अब्बासी यांनी प्रथम अटकेला विरोध केला, मात्र नंतर त्यांचा विरोध कमी झाला.

अब्बासी हे ऑगस्ट 2017 ते मे 2018 दरम्यान पकिस्तानचे पंतप्रधान होते. पत्रकार परिषद घेण्यासाठी ते इस्लामाबादेतून लाहोरला आले होते. मात्र पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. अब्बासी पेट्रोलियम आणि नैसर्गिक उर्जा स्रोत मंत्री होते, तेंव्हापासूनच त्यांच्याविरोधात कतारमधून “एलएनजी’ आयात करण्याच्या करारातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी “एनएबी’कडून तपास केला जात होता. अब्बासी यांनी आपल्याविरोधातील आरोप फेटाळले आहेत. न्यायालयामध्ये आपले निरपराधित्व सिद्ध केले जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

अब्बासी यांना अटक करण्यापूर्वी “एनएबी’ने त्यांना गुरुवारी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र अब्बासी यांनी चौकशीला उपस्थित राहणे टाळले होते. अब्बासी यांना पंतप्रधान इम्रान खान यांच्या थेट आदेशावरूनच अटक करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाने केला आहे.फॅसिस्ट कृतीद्वारे विरोधकांना गुन्हेगार ठरवण्याचा हा प्रयत्न आहे, असे “पीएमएल-एन’ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी केली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे 7 वर्षांच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहेत, तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे देखील बनावट बॅंक खाती प्रकरणी “एनएबी’च्या कोठडीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)