पुणे – ज्येष्ठ दाम्पत्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले कन्नड (जि. औरंगाबाद)चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानेही फेटाळला. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन फेटाळला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी याबाबत आदेश दिला अहे. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे पत्नीकडून सांगितले जात असतानाही जाधव यांनी अजय चड्डा यांना मारहाण केली.
जाधव यांच्याविरोधात 12 गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ऍड. प्रदीप गेहलोत यांनी केला.
जाधव यांची सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बचाव पक्षातर्फे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यास ऍड. गेहलोत यांनी विरोध केला.