नवी दिल्ली : कर्नाटकात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष प्रचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कर्नाटकातून मोठी बातमी समोर येत आहे. जेडी (एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची प्रकृती अचानक खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात दाखल आहेत.
बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलकडून याविषयी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. हॉस्पिटलने निवेदनात,’एचडी कुमारस्वामी यांची प्रकृती सध्या ठीक आहे असून ते निरोगी आहेत.” असे सांगण्यात आले आहे. एचडी कुमारस्वामी यांना 22 एप्रिल रोजी थकवा आणि अशक्तपणामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मणिपाल हॉस्पिटलनं निवेदनात म्हटले, कुमारस्वामी यांना 22 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांच्या देखरेखीखाली मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थकवा आणि अशक्तपणामुळं त्यांना इथं दाखल करण्यात आलं. सध्या ते निरोगी आहेत.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षानंही आपले उमेदवार उतरवले आहेत.