वॉशिंग्टन – भारतासह अन्य शेजारील देशांना धमकावण्याची चीनची भूमिका चिंताजनक आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनची ही वर्तवणूक त्यांच्या प्रदेशात तसेच जगात अस्थिरता निर्माण करणारी आहे असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या प्रकरणात अमेरिका आपल्या मित्र देशांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अमेरिकेने म्हटले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पस्की यांनी वरील प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी सांगितले की भारत-चीन सीमेवर ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दोन्ही देशांनी आपले सीमा प्रश्न शांततापुर्ण मार्गाने आणि चर्चेद्वारे सोडवले पाहिजेत यासाठी अमेरिका आग्रही आहे असेही त्यांनी नमूद केले. आपल्या शेजारील देशांना धमकावण्याची ही चीनची भूमिका चुकीची आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भारत आणि चीन यांच्यातील लष्करी पातळीवरील पुढी बोलणी येत्या 12 जानेवारीला दिल्लीत होत आहेत.