कात्रज -कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याच्या खांबासाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सांगाडा सोमवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
कात्रज चौक-कोंढवा रस्त्यावर हे काम सुरू आहे. पुलाच्या 13 नंबरच्या खांबाचा हा लोखंडी सांगाडा आहे. उड्डाण पुलासाठी एकूण 20 पैकी जवळजवळ सर्व खांब सिमेंट कॉंक्रीट टाकून पूर्ण झाले. आहे. त्यापैकी तेरा क्रमांकाच्या खांबासाठी हे काम सुरू होते. त्याच्यासाठी लोखंडी सांगाडा उभा करताना तोल जाऊन तो कोसळला, असे डीएमआर कंत्राटी कंपनीचे प्लॅनिंग मॅनेजर एस. कंबोज यांनी यावेळी सांगितले.
वंडरसिटी ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील राजस सोसायटी चौकापर्यंतच्या या नियोजित उड्डाणपुलाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचआय) केली जाणार आहे. कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी हा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.