पुणे – मार्केटयार्डात रविवारी फुलांना मागणी साधारण होती. उत्पादनात घट झाल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे फुलांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : 20-40, गुलछडी : 100-130, ऑष्टर : जुडी 10-15, सुट्टा 60-80, कापरी : 30-50, शेवंती : 50-120, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 15-25.