बीजिंग: चीनमध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 24 प्रांतांमध्ये आलेल्या पुराचा फटका तब्बल 23.86 दशलक्ष लोकांना बसला आहे. आपत्कालिन व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली.
जिनावी, अन्हुई, हुबेई आणि हुनान आदी प्रांतांमध्ये पुरामुळे 31 जण मरण पावले किंवा बेपत्ता झाले आहेत. या भागातील 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. पुरामुळे दीड लाख घरांचे नुकसान झाले आहे. तर 64.39 अब्ज युआन (9.19 अब्ज डॉलर) इतक्या किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
गेल्या पाच वर्षात याच कालावधीमध्ये आलेल्या पुरात जितक्या लोकांचा मृत्यू झाला, किंवा जेवढे लोक बेपत्ता झाले त्यापेक्षा यावर्षीच्या पुरात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 82 टक्क्यांनी कमी आहे. तर आर्थिक नुकसानदेखील 5.9 टक्क्यांनी कमी आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने म्हटले आहे.
जून महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दक्षिण चीनमधील बहुतेक भागांमध्ये पूर आले आहेत. या भागातील नद्यांचे पाणी लगतच्या गावांमध्ये घुसले आहे.