पुणे : छत्रपती युवा संघातर्फे बिबवेवाडी येथील शेलार नगर व आजूबाजूच्या परिसरात फराळ वाटप करण्यात आले. मध्यंतरी पुण्यात झालेल्या पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती युवा संघाने या ठिकाणील पूरग्रस्तांना फराळ वाटप निर्णय घेतला. संघाच्यावतीने गेल्या तीन वर्षात शिवनेरी येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात येते.
यंदाच्या दिवाळीला हा दीपोत्सव साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांची “आधी प्रजा मग राजा” ही शिकवण लक्षात घेऊन मदतीचा हा निर्णय घेण्यात आला.