पापणी फडफडणे म्हणजे नेमके काय ?

आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव डोळे असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

कधी तरी अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण आहे. यामध्ये ब-याचदा फक्त डोळ्याच्या वरचीच पापणी फडफडते. अचानक जाणवणारा हा त्रास थोडया वेळात आपोआप कमी होतो. मात्र हा त्रास महीना पर्यंत जाणवत असल्यास हा एक आजार असून शकतो या आजाराला मायक्योमिया असे म्हणतात. डोळ्यांच्या पापण्यांमधील स्नायूंच्या आकुंचनामुळे हा त्रास जाणवतो.

लक्षणे 

ताणतणाव
डोणे लवण्याचे मुख्य कारण ताणतणाव हे असू शकते.तुमच्या जीवनातील ताणतणावाचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होत असतो.ज्याचा परिणाम तुमच्या दृष्टीवर देखील होऊ शकतो. जाणून घ्या डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

डोळ्यांवर ताण येणे 
तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर अथवा चष्म्याच्या काचा नियमित बदलणे गरजेचे असते.मात्र असे न केल्यास डोळ्यांवर ताण येतो.त्याचप्रमाणे सतत डोळ्यांवर ताण येईल असे काम केल्याने देखील हा ताण जाणवतो.यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करा.

कॅफेन 
कॅफेनच्या अती सेवनानेही डोळे लवण्याचा त्रास जाणवतो.यासाठी चहा,कॉफी,चॉकलेट व सॉफ्ट ड्रींक्सचा कमी वापर करा.

डोळे कोरडे होणे 
जे लोक कामाच्या ठिकाणी सतत कंम्युटरचा वापर करतात त्यांनाही डोळे कोरडे होत असल्याचा अनुभव येतो.काही ठराविक औषधांचा नियमित वापर केल्याने किंवा नियमित कॉन्टॅंक्ट लेंन्सचा वापर केल्याने डोळे कोरडे होतात व ते फडफडण्याची समस्या निर्माण होते.याबाबतीत विशेष काळजी घेतल्यास डोळे फडफडण्याचा त्रास हळूहळू कमी होतो.

एलर्जी 
डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास डोळ्यांमध्ये खाज येते, डोळ्यांमध्ये सुज व पाणी येण्याची शक्यता असते.ज्यामुळे डोळा लवण्याचे प्रमाण वाढते.वेळीच डॉक्टरच्या सल्यानुसार औषधोपचार केल्यास हा त्रास बरा होऊ शकतो.

अल्कोहोल
सतत मद्यपान केल्याने डोळ्यांची फडफड होण्याचे प्रमाण अधिक होते.यासाठी मद्यपान करणे टाळा.


असतुंलित आहार 

जर तुमचा आहार असतुंलित असेल तर शरीराला मॅग्नेशियमसारखी पोषण मुल्ये पुरेश्या प्रमाणात मिळत नाहीत व त्यामुळे देखील डोळे फडफडण्याच्या त्रास उद्धवतो.

थकवा
अपु-या झोपेमुळे शरीराला आवश्यक तो आराम मिळत नाही.त्यामुळे देखील कधीकधी डोळे फडफडू लागतात.यासाठी पुरेशी झोप घेणे नेहमीच फायद्याचे असते.

Leave A Reply

Your email address will not be published.