पुणे – नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी यंदा महापालिकेतर्फे प्रथमच “लकी ड्रॉ’ हा उपक्रम राबवण्यात आला. याची सोडत रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे हे यावेळी उपस्थित होते.
सोडतीनुसार पाच भाग्यवंत पुणेकरांना पेट्रोल कार तर 15 भाग्यवंतांना ईलक्ट्रिक स्कूटर बक्षीस जाहीर झाले. याशिवाय एकूण 45 भाग्यवंतांना लॅपटॉप, आयफोनसारखी बक्षिसे जाहीर झाली. या योजनेमध्ये पाच पेट्रोल कार, 15 ई-बाईक, 15 मोबाइल फोन, 10 लॅपटॉप अशी एकूण 45 बक्षिसे मिळवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. 31 जुलैपर्यंत नियमित मुदत आणि वाढीव मुदतीसह दोन ऑगस्टअखेर संपूर्ण मिळकतकर भरलेले मिळकतधारक या साठी पात्र ठरले.
हे आहेत भाग्यवान विजेते पेट्रोल कारचे विजेते
गट- वार्षिक कर 25 हजार रुपयांपर्यंतचा मिळकतकर : 1) दिपाली व दर्शन ठाकूर, 2) प्रियांका पोखरकर मुखेकर आणि निखील मुखेकर
25 हजार ते 50 हजारांपर्यंत
1) माणिक ज्ञानोबा ढोणे
50 हजार ते एक लाखापर्यंत
1) आदित्य कुमार, मनिका राणी, अशोक कुमार आणि विनिता कुमार अगरवाल
एक लाख आणि त्याहून अधिक
1) गणेश ज्ञानोबा कळमकर आणि ज्योती गणेश कळमकर
माजी नगरसेविकेला कारचे बक्षीस
एक लाखांहून अधिक रकमेचा मिळकतकर भरलेल्यांच्या गटामध्ये माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांना पेट्रोल कारचे बक्षीस जाहीर झाले. एक लाखांहून अधिक रकमेचा मिळकतकर भरलेल्यांमध्ये नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि एका साडीच्या दुकानाला ईलक्ट्रिक स्कूटरचे बक्षीस जाहीर झाले आहे.