रुढी परंपरेला फाटा; पाच मुलींकडून आईच्या पार्थिवाला खांदा, प्रसंग बघून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले

गडचिरोली – मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो; मात्र गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील आईला पाच मुलींनी पार्थिवाला खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

वंशाचा दिवा मुलगाच हा समज दूर करत या पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नाही. दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील रहिवासी अण्णाजी रामचंद्र पाकलवार यांच्या पत्नी निर्मला पाकलवार यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना 5 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.