नवी दिल्ली – जगातील प्रत्येक देश हा करोनाच्या महामारीतून बचावासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत. करोना पासून बचावासाठी प्रत्येक देशाने काही नियमावली देशातील नागरिकांसाठी लागू केली आहे. मात्र अनेकदा या नियमांचे पालन न केल्यामुळे नागरिकांना शिक्षा देण्यात आल्याच्या घटना घडल्या आहे.
करोना नियमांचे पालन न केल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल ५ वर्षाची शिक्षा झाली आहे. हा प्रकार व्हिएतनाम देश घडला असून येथील एक व्यक्तीस जाणूनबुजून त्याच्या परिचितांमध्ये कोरोना संसर्ग पसरवल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे त्याला शिक्षा झाली आहे.
इंग्रजी वृत्तपत्रानुसार, या व्यक्तीचे नाव ली व्हॅन ट्री असून परिचितांमध्ये कोरोना संसर्ग पसरवल्याबद्दल त्याच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला. यावेळी त्याला कोरोना नियमांचे पालन न करणे आणि संसर्ग पसरवण्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. या प्रकरणात त्याला ५ वर्षाची तर आणखी दोन लोकांना 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.