शहरातील पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये शनिवारी पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवीन 108 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच 55 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 99519 जणांना करोनाची लागण झाली आहे.

शहरातील 108 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच दिवसभरात 5 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये शहरातील दिघी व पिंपरी येथील 2 व शहराबाहेरील सातारा, जुन्नर व ऊरळी कांचन येथील 3 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 2550 इतक्‍या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1794 तर शहराबाहेरील 756 रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात 55 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 96125 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2307 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1583 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 608 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 992 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1600 इतकी आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.