उस्मानाबाद(प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्हातील आणखी पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील तीन रुग्ण, मुंबई रिटर्न कळंब तालुक्यातील भातशिरपूरा येथील एक, मुंबई रिटर्न आणि उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एक रुग्णाचा समावेश आहे. आज(दि.26) दुपारीच तीन रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता त्यात आणखीन पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हातील रुग्णाची संख्या 43 इतकी झाली आहे .
आज(दि.26) जिल्हा रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हातील 77 व्यक्ती चे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 61 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 5 जणांचे अहवाल आले आहे आणि 11 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.