जयपुर – करोनाच्या ओमायक्रॉन विषाणुंमुळे देशातील पहिल्या रूग्णाचा बळी राजस्थान मध्ये नोंदवला गेला आहे. हा रूग्ण उदयपुर येथील रहिवासी होता व तो 73 वर्षांचा होता. 15 डिसेंबर मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली होती, त्यात त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.
तथापि ते खूप आधीपासूनच रक्तदाब आणि मधुमेहाचे रूग्ण होते असे सांगण्यात येत आहे. तथापि याच रूग्णाची जिनॉम सिक्वेसिंग चाचणी 25 डिसेंबर रोजी घेण्यात आली त्यात ते करोना बाधित असल्याचे आढळून आले होते.
तथापि 15 व 25 डिसेंबरच्या मध्ये 21 डिसेंबर रोजी त्यांची पुन्हा एक कोविड चाचणी घेण्यात आली होती त्यात मात्र ते करोना बाधित नसल्याचा अहवाल आला होता. त्यांनी करोना लसींचे दोन्ही डोस घेतले होते व त्यांची अलिकडच्या काळात कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नव्हती. तथापि नियमानुसार त्यांच्या मृत्यूची नोंद ओमायक्रॉन मृत्यू अशीच करण्यात आली आहे.