‘राधेश्याम’ चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लूक प्रदर्शित

मुंबई – टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवणारा बाहुबली म्हणजेच, अभिनेता ‘प्रभास’ बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू करतो. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आणि त्याच्या अभिनयाला सिनेप्रेक्षक तुफान दाद देत असतात.

बाहुबली ऍक्टर प्रभास  हा आज  23 ऑक्‍टोबर रोजी आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्याला राधे श्याम चित्रपटाच्या टीमने एक खास भेट दिली आहे. अलिकडेच प्रभासच्या आगामी राधे श्याम या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

आज  प्रभासच्या आगामी ‘राधेश्याम’ या  बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसून येत आहे. ‘राधेश्याम’ मध्ये अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Hello darlings… A surprise coming your way, tomorrow. Stay tuned… #SaahoSurprise

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये प्रभास एका लक्झरी गाडीला टेकून उभा असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जॉर्जिया येथे सुरु होतं. मात्र, करोना विषाणूमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर राहिलं. त्यानंतर या चित्रपटाचं इटलीमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.