शिक्षक सेनेच्या सुनिल जगताप यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

शिक्षकेतर कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ

पुणे – शिक्षक संघटनेच्या वादातून एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ आणी धक्का-बुक्की करण्यात आली. ही घटना जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या परिसरात घडली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक सुनिल जगताप(52,रा.मुंढवा) याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अविनाश वसंत पवार(36,रा.चिखली प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या तक्रारीनूसार अविनाश हे कार्यरत असलेल्या शाळेच्या ओळखपत्राच्या कामकाजासाठी माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. यावेळी सुनिल जगताप यांनी दुसऱ्या मजल्यावरील लिफ्ट शेजारील जिन्यात त्यांना गाठले.

तेथे त्यांच्या अंगावर धाऊन जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. यानंतर त्यांना तू आमच्या संघटनेचे काम सोडून दूसऱ्या संघटनेचे काम करतोस काय? आमची संघटना ही शिवसेनेची आहे, आम्ही आत्ता सत्तेत आहोत. नीट रहा नाही तर पुढच्या वेळी डायरेक्‍ट नोकरी जाईल अशी धमकी दिली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (फरासखाना) करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.