‘नो होल्ड्स बार्ड’ राणेंच्या आत्मचरित्रचा फर्स्‍ट लुक

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ‘नारायण राणे’ हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार असल्याचे काही दिवसांपूर्वी राणे यांचे सुपुत्र ‘नितेश राणे’ यांनी सांगितले होते. नितेश राणे यांनी स्वतःहा ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. “माझे वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून, लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. असे ट्विट केले होते. ‘नो होल्ड्स बार्ड’ असे या आत्म्यचरित्रचे नाव आहे.मात्र, राणेंच हे आत्म्यचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच त्यापैकी काही टप्प्यांची माहिती सध्या समोर आली आहे. या 192 पानांच्या पुस्तकात नारायण राणे यांनी त्यांचा संपूर्ण जीवन पट रंगवला आहे.

या पुस्तकात राणे यांचा सुरुवातीचा प्रवास हा पहिला टप्पा, शिवसैनिक हा दुसरा टप्पा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतानाच्या आठवणी, तेव्हाचे राजकारण, खुर्चीचा किस्सा आणि त्यानंतर पुस्तकामध्ये काँग्रेसच्या वाटेवरचा एक महत्वाचा टप्पा वाचायला मिळणार आहे. मुख्यमंत्री पदाचं राजकारण करुन झालेली फसवणूक हा त्याच्या पुढचा टप्पा असेल. त्यानंतर
नारायण राणेंचा भाजप प्रवेश अश्या अनेक खळबळजनक गोष्टी या आत्मचरित्रातून बाहेर येणार आहेत.

1972 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर राणेंनी 1999 या काळात महाराष्ट्रचं मुख्यंत्रीपद सांभाळलं. नंतर 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून, ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.