मुंबई – आज (मंगळवार) वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीच तब्ब्ल 22 उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून, उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. तर उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यात कसब्यातून मिलिंद काची यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवाजीनगरमधून अनिल शंकर कुऱ्हाडे यांना तिकीट दिले आहे.