सातारा: सातारा शहर व परिसराला सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. खटाव व फलटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
साताऱ्यात दुपारपर्यंत उन्हाचा चटका होता. पाच वाजता अंधारुन आले आणि धो धो पाऊस कोसळू लागला. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. आता जोरदार सरी कोसळत आहेत. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पावसाने ब्रिटीशकालीन नेर तलाव भरला आहे. फलटणच्या दक्षिणेकडील भागात पावसाने ओढेनाले खळाळून वाहिले.