अग्निशामक दलाचे जवान ठरले “देवदूत’

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पिंपरीच्या खराळवाडी भागात शनिवारी (दि. 16) सकाळी एक गाय ड्रेनेजमध्ये अडकली होती. नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने गायीला सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र अग्निशामक दलाच्या “देवदूत’ नावाच्या वाहनातून आलेले जवान त्या गायीसाठी “देवदूत’ ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ,

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.10 वाजताच्या सुमारास खराळवाडी येथील सोनरुपा अपार्टमेंट नजीक सार्वजनिक शौचालयाजवळील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाय अडकली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्रास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या “देवदूत’ या वाहनातून अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही स्थानिक नागरिक गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.

खराळवाडी प्रतिबंधित परिसर असल्याने अग्निशामक दलाने घटनास्थळावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज चेंबरच्या कडेच्या तुटलेल्या लोखंडी सळया आणि सिमेंट बाजूला केले. दोन रेस्क्यू बेल्ट गाईच्या पोटाशी अडकवण्यात आले. ते बेल्टचे लूप मजबूत बांबूमध्ये अडकवून अग्निशमन कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी एकत्रितपणे गाईला सुखरूप बाहेर काढले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.