मुंबई – पौराणिक कथांपासून ऍक्शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्शन पर्यंत भारतीय सुपरस्टार ‘प्रभास’ने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. आणि त्यामुळेच प्रभासने एक नवे शिखर गाठले असून, तो लवकरच आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात प्रभास सोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित असून, या चित्रपटाचे डायरेक्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये 3D फॉरमॅटमध्ये रिलीज होणार आहे.
दरम्यान, प्रभासचा एक चित्रपट आधीच प्रदर्शनाच्या तयारीत असून अभिनेत्यानं नुकतंच त्याच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली आहे. त्यामुळे आता प्रभासचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर करण्यात असून, यामध्ये प्रभासनं लिहलं आहे की..,
The Most Violent Man is coming soon with the full package to blow your mind on Sep 28th, 2023.
Hello @RCBTweets, let’s unleash the Rebel mode this year 🔥#Salaar #Prabhas #PrashanthNeel #VijayKiragandur#RCBxHombale @hombalefilms pic.twitter.com/ueQT3qC2aH
— Salaar (@SalaarTheSaga) April 5, 2023
“28 सप्टेंबर 2023 रोजी एक हिंसक व्यक्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमची झोप उडवण्यासाठी तो सज्ज आहे”. चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली. या चित्रपटात प्रभास आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. सध्या अभिनेत्याच्या या पोस्टवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.