मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांच्यावरील झालेल्या या कारवाईने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व विरोधी पक्षाकडून आंदोलन करत या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. अशातच राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केले आहे. या आरोपांवर आणि विरोधकांच्या टीकेवर भाजप खासदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना नितेश राणे म्हणाले,’जसे अजमल कसाब वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तसा राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पाकिस्तान मध्ये हाकलून द्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.’
ते पुढे म्हणाले,’ राहुल गांधी यांची केवळ खासदारकी काढून घेऊन थांबू नका, मोदी नावाचे सगळे चोर आहेत असे बोलायला आणि ओबीसी समाजाची बदनामी देशाची बदनामी करायला भाजपने सांगितले नव्हते. तसेच न्यायलायात गेलेला माणूस ही भाजपचा नव्हता. तसेच बदनामी राहुल गांधी यांनी करायची आणि आता कायद्याने काम केलं की भाजपच्या नावाने बोंबलायचं हा कुठला नियम? यापेक्षा राहुल गांधींना भाषण येत नसेल तर थोबाड बंद करायला सांगा,’ असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.