Fighter : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचा आगामी ‘फायटर’ ( Fighter ) सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे. या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय करण सिंग ग्रोव्हर आणि तलत अजीज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एरियल अॅक्शनवर आधारित आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार असल्याचं बोललं जात आहे.
अश्यातच या सिनेमातील ‘इश्क जैसा कुछ’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे समुद्र किनाऱ्यावर शूट करण्यात आलं असून, या गाण्यात हे कपल खूपच मौजमस्ती करताना दिसत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये हृतिकच्या शरीरवृष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, तर दीपिका पादुकोण यावेळी खूपच हॉट दिसत आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांत 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. ‘फायटर’ या चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.