Richa Ghosh Runout Beth Mooney : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 406 धावा ठोकल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाज बेथ मुनी हिला भारताच्या रिचा घोषने स्वप्नातही कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीने धावबाद केले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिचा घोषचे शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, तिने खेळात जागरूकता दाखवत बेथ मुनीला धावबाद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची पहिली विकेट रिचा घोषने घेतली. बेथ मुनीचा रनआउटचा व्हिडिओ बीसीसीआय महिलांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी रिचा घोषने कशी जागरूकता दाखलली हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू अगदी जवळ उभ्या असलेल्या ऋचा घोषकडे गेला, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, यादरम्यान उर्वरित महिला भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचे अपील केले. यादरम्यान बेथ मुनी क्रीजमधून बाहेर आली आणि याचा फायदा घेत रिचाने स्टंपवर चेंडू मारला आणि तिला धावबाद केले.
व्हिडीओ येथे 👇👇👇👇 पहा…
𝙍𝙐𝙉-𝙊𝙐𝙏! 🎯
How about that for game awareness 👌 👌
That was brilliant from Richa Ghosh 🙌 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/8qTsM8XSpd #TeamIndia | #INDvAUS | @13richaghosh | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/c3O3O249DA
— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2023
रनआउट इतका स्पष्ट होता की मैदानी पंचांना तिसऱ्या पंचाची मदतही घ्यावी लागली नाही. पुढे व्हिडीओमध्ये रिचाने आपल्या हुशारीने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला कसे बाद केले हे देखील स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाकडे 46 धावांची आघाडी…
दरम्यान, या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा केल्या आणि टीम इंडियाला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाची आघाडी 46 धावांची झाली आहे.