Fight In JNU : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये मारामारीची घटना समोर आली आहे. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये सर्वसाधारण सभेच्या (जीबीएम) दरम्यान मारामारी झाली आहे. गुरुवारी रात्री निवडणूक समिती सदस्य निवडीवरून अभाविप आणि डाव्या समर्थक गटांमध्ये झालेल्या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले.
जेएनयु विद्यार्थी संघ २०२४ निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील साबरमती ढाब्यावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. | Fight In JNU
विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे.
घटनेच्या आणखी एका व्हिडिओमध्ये, काही लोक इतरांशी भांडताना दिसत आहेत आणि विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या गटाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. | Fight In JNU
या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले. तीन जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचारही करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार आली नसून, याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. | Fight In JNU
फेब्रुवारीमध्येही झाली होती जेएनयूमध्ये हाणामारी
जेएनयूमधील विद्यार्थ्यांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही. मागील महिन्यात १० फेब्रुवारी रोजी देखील, विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीदरम्यान, विद्यार्थी परिषद आणि डाव्या पक्षांना पाठिंबा देणाऱ्या गटांमध्ये रात्री उशिरा संघर्ष झाला होता. त्यावेळी दोन्ही पक्षांनी दावा केला की त्यांचे काही सदस्य जखमी झाले होते.