वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचे मतदान मंगळवारी (दि. 21) होणार असून, बुधवारी (दि. 22) मतमोजणी होणार आहे. उधेवाडी अर्ज प्राप्त नसल्याने जागा रिक्त, करूंज, नाणोलीतर्फे चाकण, औंढे खुर्द, टाकवे खुर्द, जांभवडे, बेबड ओहोळ, आंबी, गोडुंब्रे, ठाकूर साई, केवरे चावसर व नवलाख उंब्रे या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक बिनविरोध झाल्या.
साळुंब्रे, धामणे, मळवंडी ठुले ग्रामपंचायतीमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, दुरंगी लढत होणार आहे. मतदान मंगळवारी (दि. 21) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होईल. बुधवारी (दि. 22) मतमोजणी मावळ तहसील कार्यालयात होणार आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
बिनविरोध ग्रामपंचायती…
बेबडओहोळ : वार्ड क्रमांक 3 (अनुसूचित जाती) – सुधीर गायकवाड, तर सर्वसाधारण एक जागेसाठी संदीप घारे (बिनविरोध). गोडुंब्रे : वार्ड क्रमांक 1 (सर्वसाधारण स्त्री) – मनीषा येवले (बिनविरोध). आंबी : वार्ड क्रमांक 3 (सर्वसाधारण स्त्री) – बायडाबाई घोजगे (बिनविरोध). नाणोलीतर्फे चाकण : वार्ड क्रमांक 2 (सर्वसाधारण स्त्री) शुभांगी लोंढे (बिनविरोध). साळुंब्रे : वार्ड क्रमांक 3 (सर्वसाधारण स्त्री) सीमा राक्षे (बिनविरोध). जांभवडे : वार्ड क्रमांक 1 (सर्वसाधारण) – सागर नाटक (बिनविरोध). वार्ड क्रमांक 2 – (सर्वसाधारण स्त्री) सुनीता भांगरे (बिनविरोध), तर वार्ड क्रमांक 2 (सर्वसाधारण) – मंगेश भोसले (बिनविरोध).
केवरे चावसर : वार्ड क्रमांक 2 (सर्वसाधारण) – हनुमंत गोणते (बिनविरोध). करूंज : वार्ड क्रमांक 2 (अनुसूचित जमाती) – संतोष बाळू जाधव (बिनविरोध). ठाकूर साई : वार्ड क्रमांक 2 (सर्वसाधारण स्त्री) – मंगला कारके (बिनविरोध). उधेवाडी : वार्ड क्रमांक 1 (अनुसूचित जमाती) – एक जागेसाठी एकही अर्ज प्राप्त नसल्याने जागा रिक्त. औंढे खुर्द : वार्ड क्रमांक 2 (अनुसूचित जमाती) – रवी उर्फ रवींद्र मानकर (बिनविरोध). टाकवे खुर्द : वार्ड क्रमांक 3 (सर्वसाधारण)- बाळासाहेब पिंप्रे (बिनविरोध). नवलाख उंब्रे : वार्ड क्रमांक 1 (सर्वसाधारण स्त्री) – विजया शेटे (बिनविरोध).
मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी बजरंग मेकाले, प्रकाश बलकवडे, दीपक राक्षे, तलाठी वैभव भुतेकर, राम बाचेवड, दिलीप राठोड आदी निवडणूक कामकाज करत आहेत.
या ठिकाणी दुरंगी लढती…
धामणे : वॉर्ड क्रमांक 3 (अनुसूचित जाती) – एक जागेसाठी दोन उमेदवार मोनाली उर्फ सोनाली थोरवे विरूद्ध स्वीटी गायकवाड दुरंगी लढत.
मळवंडी ठुले : वॉर्ड क्रमांक 1 (सर्वसाधारण स्त्री) – एक जागेसाठी दोन उमेदवार वंदना बेनगुडे, रोहिणी ठुले यांची दुरंगी लढत.
साळुंब्रे : वॉर्ड क्रमांक 2 (सर्वसाधारण स्त्री) – एक जागेसाठी दोन उमेदवार सुजाता अनपट व अर्चना विधाटे यांची दुरंगी लढत.